अगदी चार रेषात महात्मा गांधींचे चित्र काढलेले तुम्ही बघितले असेलच. आमच्या चित्रकलेच्या घोळक्यातही अशाच संदेशाची देवाण घेवाण होते. 'अजून रेघा ओढू नका. अजून रंग टाकू नका.चित्र खराब होईल.'
अगदी थोडक्यात बरेच काही सांगायचे हे एक सर्वव्यापी कौशल्य आहे. आपल्या पुराणात नाही कां छोट्या सूत्रात धर्माची वैशिष्ट्ये सांगितली गेली होती.
संस्कृत भाषेतील अनेक श्लोकांचा उपयोग आपल्याकडच्या संस्थांनी, सार्वजनिक कंपन्यांनी सढळपणे केला आहे। 'योगक्षेमं वहाम्यहम' किंवा 'ज्ञानम परमं ध्येयम' किंवा 'तमसो मा ज्योतिर्गमय' अशी छोटी सूत्रे महत्वाचा आशय मांडतात.
गणितासारख्या विषयात देखील अनेक छोटी सूत्रे रचली गेली होती। छोट्या ब्लॉगमध्ये बरेच काही सांगता आला पाहिजे कारण सध्या वाचायला कोणाला वेळ आहे? पण ब्लॉगवाल्या लोकांना शिस्त कोण लावणार? इथेच बहुधा ट्वीटरचा बोलबाला सर्वत्र सुरु झाला. त्यात लागणारी शिस्त म्हणजेच सूत्रबद्ध रितीने संवाद करणे. मी अजूनही ट्वीटरचा उपयोग केला नाही आहे. पण राहून राहून वाटत राहते की ट्वीटची शब्दसंख्या अजूनही मर्यादीत होईल व त्याची लोकप्रियता वाढेल. पण एक गोष्ट नक्की. ती म्हणजे छोटा ब्लॉग लिहायला जास्त वेळ लागेल.
सुज्ञांस अधिक सांगणे न लगे !

0 comments:
Post a Comment